जन्म घ्या शिवराज 

जगाच्या पाठीवर नाही झाला

राजा तुमाच्या-परी

अवतार घ्या महाराष्ट्रात

गरज आहे खरी

 

नाही उरले बाजी तानाजी

आणि त्यांचे संस्कार

युवा पिढी झालीय व्यसनाधिन

वाटतो त्यांचा धिक्कार

 

फुकनीसारखे मनगट घेऊन

राजे हे काय लढणार

मग सुराज्याची पताका

वर कशी काय चढणार

 

घ्या अवतार राजे

तालमींना महत्व येऊ दे

दणकट सारे शरीर यांचे

मनगट पोलादी होऊ दे

 

पिझ्झा बर्गर संस्कृतीतून

काढा यांना बाहेर

द्यायला शिकवा यांना

साडी चोळीचा आहेर

 

दुमदुमू देत पुन्हा महाराष्ट्रात

एकवीस तोफांचे आवाज

कनकनातून नाद येईल

जन्म घ्या शिवराज

जन्म घ्या शिवराज 


                   -बाळराजे

Advertisements

तुझ्या  माझ्या आठवणी

आठविती आज  मला

तुझ्या  माझ्या आठवणी

तुझ्या माझ्या  माझ्या तुझ्या

तुझ्या माझ्या आठवनी  !!धृ!!

वेडावले, मन  असे

हरजागी तूच  दिसे

वेडावल्या माझ्या मना

का ग होती  भास  असे?

श्वासावरी तुझे  नाव  अन

ओठावरी तुझी गाणी…

आठविती आज  मला

तुझ्या  माझ्या आठवणी

तुझ्या माझ्या  माझ्या तुझ्या

तुझ्या माझ्या आठवनी   !! १!!

 

ये  ग राणी  परतुनी

तुझी माझी  साथ  जुनी

आठविता तुला  मग

डोळ्यामध्ये येते  पाणी

विसरावे तुला म्हणता

आठविसी क्षणोक्षणी

आठविती आज  मला

तुझ्या  माझ्या आठवणी

तुझ्या माझ्या  माझ्या तुझ्या

तुझ्या माझ्या आठवनी  !!२!!

 

सोडोनिया जाशी दूर

आसवांचा येतो  पूर

तू गं माझ्या सवें नसता

मना लागे हुरहूर

￰￰बोल माझे फुलराणी

येशील का परतुनी

आठविती आज  मला

तुझ्या  माझ्या आठवणी

तुझ्या माझ्या  माझ्या तुझ्या

तुझ्या माझ्या आठवनी  !!३!!

 

        ………बाळराजे…….

प्रिये तू परतुनी येशील का ?

पाणझडीचा गुलमोहोर तो,

पुन्हा एकदा बहरुनी आला

वसंताच्या आगमनाची

चाहूल पुन्हा देऊन गेला

तसाच हिरवा बहर पुन्हा

या नात्यामधे आणशील का ?

love4

 

तू जरी निघून गेलीस

मी अजूनही तिथेच आहे

प्रेमाच्या या सारितेमध्ये

भांडे माझे रितेच आहे

तिथेच थांबलेल्या वेड्याकडे

वळून एकदा पाहशील का ?

प्रिये तू परतुनी येशील का?

 

कसे विसरावे तुला प्रिये

विसरणे मला होत नाही

तू पुन्हा परत येशील

असेच मनात येत राही

जवळ अशी तू येऊन पुन्हा,

कवेत मला घेशील का?

प्रिये तू परतुनी येशील का?

 

असशील तेथून निघून ये

तुझ्या परतीची पाहतोय वाट

पुन्हा एकदा सर करायचाय

तुझ्या प्रीतीचा अवघड घाट

तुझ्या आयुष्यात परतण्याची

संधी मजला देशील का?

प्रिये तू परतुनी येशील का?

 

…बाळराजे…..

सोबत मला देशील ना?

होकाराची वाट पाहून

दमलोय मी आज

उगाचच चढवून ठेवलाय

तुझ्या स्वप्नांचा साज

 

प्राण आलेत कंठाशी

पाहतोय मी वाट

मला सहन करून दमलाय

नदीचा तो काठ

prem he

उत्तराची तुझ्या प्रिये

करतोय मी प्रतीक्षा

लवकर कळव होकार-नकार

का देतेस शिक्षा?

 

निराश मला करणार नाहीस

याची खात्री वाटतेय

नवनवीन आठवण तुझी

माझ्या मनात साठतीय

 

अधीर होऊन पाहतोय

तुझ्या उत्तराची वाट

नकोस तू डावलून जाऊ

मांडलेले हे ताट

 

शेवटी निर्णय तुझाच असेल

होकार मला देशील ना?

आयुष्याच्या सुंदर वाटेवर

सोबत मला देशील ना?

 

 ☺☺बाळराजे☺☺

असुडाचा घाव

shetkari

रानी राबून-कष्टून

पिका नाही हमीभाव

ऐशोआरामे जगती

सारे रंक आणि राव

पोशिंद्याच्या पाठीवरी

परी असुडाचा घाव

 

पीक पिकवूनी सारे

घासावरी नाही नाव

घास दुसऱ्याच्या पोटी

घेत मिशिवरी ताव

पोशिंद्याच्या पाठीवरी

परी असुडाचा घाव

 

हतबल मग होवोनी

घेई शासनाला धाव

सत्ताधारी मग म्हणती

हा विरोद्यांचा असे डाव

पोशिंद्याच्या पाठीवरी

परी असुडाचा घाव

 

त्याच्या डोळ्यात आसवे

नसे भविष्याला ठाव

चला देऊ त्याच्या पीका

मिळवुनी हमीभाव

पोशिंद्याच्या पाठीवरचा

रोखु असुडाचा घाव

——– *बाळराजे*————

प्रीतनाट्य

 

love3

दिव्य प्रकाशा घेऊन आली

मनात वसली रूपवती

हृदयाच्या तवं तारा छेडुनी

अदृश्य झाली मनोगती

 

मधुर हास्य अन गाली लाली

काळीजच तवं चोरून गेली

सौंदर्याच्या रसात नाहून

प्रीतनाट्याची नांदी झाली

 

सारे काही क्षणात घडले

विचारपूस ती राहून गेली

तिला सखीने शीळ घालता

नावाची तरी ओळख झाली

 

नाही भेट हो झाली पुन्हा

नजरेस देखील नाही पडली

अशी कुठे ती जाऊन दडली

खुळ्या जीवाची प्रीतच जडली

 

रंगलेल्या प्रीतनाट्याची

शीघ्र सांगता व्हावी

तुझी नि माझी जोडी प्रिये

स्वप्नगंधात नहावी

 

सापडशील जर पुन्हा मला

मनवेन तुला मी तासंतास

मीच तुझे हृदय असेन

आणि तूच माझा श्वास

 

————Balraje———–