असुडाचा घाव

shetkari

रानी राबून-कष्टून

पिका नाही हमीभाव

ऐशोआरामे जगती

सारे रंक आणि राव

पोशिंद्याच्या पाठीवरी

परी असुडाचा घाव

 

पीक पिकवूनी सारे

घासावरी नाही नाव

घास दुसऱ्याच्या पोटी

घेत मिशिवरी ताव

पोशिंद्याच्या पाठीवरी

परी असुडाचा घाव

 

हतबल मग होवोनी

घेई शासनाला धाव

सत्ताधारी मग म्हणती

हा विरोद्यांचा असे डाव

पोशिंद्याच्या पाठीवरी

परी असुडाचा घाव

 

त्याच्या डोळ्यात आसवे

नसे भविष्याला ठाव

चला देऊ त्याच्या पीका

मिळवुनी हमीभाव

पोशिंद्याच्या पाठीवरचा

रोखु असुडाचा घाव

——– *बाळराजे*————

Leave a comment